Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे-सातारा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा कंटेनर उलटला!

पुणे-सातारा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा कंटेनर उलटला!



नसरापूर : खरा पंचनामा

पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ नजीक घरगुती वापराची गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा कंटेनर उलटला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र तीन क्रेनच्या साहाय्याने अवजड कंटेनरला बाजूला घेत असताना देखील साखळी तुटली आहे. गॅस गळती होऊन दुर्घटना घडू नये यासाठी कंटेनरला बाजूला घेण्याचे काम सध्या सुरु आहे.

पुणे-सातारा महामार्ग येथील कापूरहोळनजीक हरिश्चंद्री (ता. भोर) येथे साताऱ्याच्या दिशेने जात असताना कंटेनर (एमएच ३१ एफसी ४०२२ बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उलटला. कंटेनरमध्ये जवळपास ३२ टन गॅस सिलेंडर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई (चेंबूर) येथून भारत कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन महामार्गावरून साताराच्या दिशेने वाईकडे जात होता. दरम्यान, महामार्गावर कार चालकाला वाचवताना कंटेनर चालक अब्दुल वाजिद याचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटून महामार्ग रस्ता सोडून सेवा रस्त्यावर लांबपर्यंत घासत गेला. कंटेनर सिलेंडर गॅसने भरलेले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. महामार्ग वाहतूक पोलीस, किकवी दूरक्षेत्राचे पोलीस, भारत गॅसचे अधिकारी, भोर नगरपालिकेचे अग्नीशामक दल, दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले असून सध्या चार क्रेनच्या साह्याने कंटेनरला बाजूला घेण्याचे युद्धपातळीवर काम सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.