दरोड्याच्या तयारीत असलेली रेकॉर्डवरील टोळी जेरबंद!
विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील भिवघाटकडे काहीजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येणाऱ्या सहाजणांच्या रेकॉर्डवरील टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक कार, रोकड, चार मोबाईल, लोखंडी कटावणी, कोयता, चाकू, पक्कड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
जितेंद्र भानुदास काळे (वय ३०, रा. मार्डी, सोलापूर), शिवाजी रामा काळे (वय २६, रा. जत), दादाराव लक्ष्मण पवार (वय ४२, रा. राणमासळे, सोलापूर), सुखदेव शिवाजी काळे (वय ३२, रा. मार्डी, सोलापूर), किरण शिवाजी काळे (वय २९, रा. मार्डी, सोलापूर), बालाजी माणिक पवार (वय २६, रा. मार्डी, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रविवारी रात्री दरोडेखोरांची एक टोळी भिवघाटमार्गे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती निरीक्षक डोके यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची चार पथके तयार केली. मध्यरात्री विटा-भिवघाट रस्त्यावर या पथकांनी सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आलेली कार अडवली. कारमध्ये सहाजण होते. गाडीची तसेच त्यांची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळले. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.
विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल येळेकर, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सचिन ओंबासे, सचिन खाडे, मनोज जाधव, किरण खाडे, अभिजित वाघमोडे, विलास मोहिते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सर्वजन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार!
या टोळीतील सर्वजन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी असे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यात गुन्हे केले आहेत का? याचा तपास विटा पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.