बॅंड बाजा, डीजे, स्पीकरला फाटा देत केले गणरायाचे विसर्जन!
चकलांबा पोलिसांनी ठेवला आगळा-वेगळा आदर्श
बीड : खरा पंचनामा
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्यात गणपती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कोणताही सण उत्सव असो तो सण सर्व सामान्य माणसाने आनंदात व उत्साहाने साजरा करावा यासाठी पोलीस दिवस रात्र एक करून प्रामाणिक प्रयत्न करतात. नागरिकांनी आपल्या परिवारासह सर्व सण उत्सव जल्लोषात व उत्साहाने साजरे करावेत यासाठी पोलीस सण, उत्सव आपल्या परिवारासह साजरा न करता ते रस्त्यावर उभे राहून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात.
तसेच आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे ही आपले परिवाराचेच सदस्य आहेत व त्यांना ही गणेशोत्सव साजरा करता यावा या हेतूने चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी मोठ्या थाटामाटात चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने बॅन्ड बाजा, डीजे, स्पीकर गुलाल याला फाटा देत फुलांचा वर्षाव करत चकलांबा पोलिसांनी विसर्जनास सुरुवात केली. मिरवणूक सुरू होता सर्वांचे आकर्षण ठरलेला चकलांबा पोलीस ठाण्याच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सर्व चकलांबा वासियांनी गर्दी केली होती. काही नागरिकांनी पोलिसासमवेत फुगडी, लेझीम, ढोल ताशा वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला व ते मिरवणुकीत सामील झाले.
गावकऱ्यांनी व गावातील मुस्लिम बांधवांनी पोलिसांचा हा उपक्रम पाहून पोलिसांचे जागजागी स्वागत करून त्यांचा सत्कार केला. सरते शेवटी यावर्षी निवृत्त होणारे सहाय्यक पोलीस फौजदार गाडे व सानप यांच्या हस्ते आरती करून गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी चकलांबा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे, उपनिरीक्षक अंनता तांगडे, उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, श्री. येळे, श्री. खटाणे, श्री. कुलकर्णी, श्री. एकाळ आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.