काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या!
कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पंजाबमधील काँग्रेस पक्षाशी संबंधित एका स्थानिक राजकारण्याची मोगा जिल्ह्यातील डाला गावात खलिस्तान कट्टरतावादी संघटनेशी संबंधित असलेल्या दहशतवाद्याने गोळ्या घालून हत्या केली.
४५ वर्षीय बलजिंदर सिंग बल्ली असे मृत राजकारण्याचे नाव आहे. सोमवारी काही हल्लेखोर त्याच्या घरात घुसले, तेव्हा त्याच्यावर दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी त्याच्या छातीत तर दुसरी मांडीला लागली. हल्लेखोर दुचाकीवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले. एक जण घरात शिरला तर दुसरा बाहेर थांबला. डाला गावातील बल्ली यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे. अजितगडमध्ये ते काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष होते.
गुन्ह्याच्या काही तासांनंतर, एक गुंड आणि कुख्यात दहशतवादी अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्श डल्ला याने त्याच्या खात्यावरील फेसबुक पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी स्वीकारली. तो सध्या कॅनडात कायमचा रहिवासी आहे. आपल्या आईला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आणि त्याच्या मित्रांना अटक केल्याचा बदला घेण्यासाठी त्याने बल्लीची हत्या केल्याचे त्याने सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.