भरधाव कारने नाकाबंदीवरील उपनिरीक्षकाला उडवले!
अंकली फाटा येथील मध्यरात्रीची घटना
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील एक
अंकली फाटा येथे गुरुवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी मिरजेकडून भरधाव आलेल्या एका कारने एका उपनिरीक्षकांना उडवले. त्यानंतर ती कार वडापावच्या दुकानात घुसली. यामध्ये उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गुरुवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली.
रामराव पाटील असे जखमी झालेल्या श्रेणी उपनिरीक्षकांचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भीमराव मींद (वय 35, रा. बिजेवाडी, इंदापूर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांनी अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील आणि त्यांचे सहकारी वाहनांची तपासणी करत होते.
रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून एक कार (एमएच 42 बीजे 4693) भरवेगात आली. त्या कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र कारने पोलिसांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ती एका वडापावच्या हॉटेलवर जाऊन आदळली. यामध्ये उपनिरीक्षक पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.