पोलिस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर परिक्षेत्राचा संघ सर्वसाधारण विजेता!
महासंचालक रजनिश शेठ यांच्याहस्ते पारितोषिक वितरण
पुणे : खरा पंचनामा
येथे 18 वा पोलिस कर्तव्य मेळावा पार पडला. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर मुंबई शहर संघाने उपविजेतेपद मिळवले. यातील विजेत्यांना राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पुण्यात राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. पुणे येथील परेड मैदानावर हा मेळावा घेण्यात आला. शनिवारी या मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना महासंचालक श्री. शेठ यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा, सर्वोत्कृष्ट संघ : सायंटीफीक एड टू इन्हवेस्टीगेशन : पुणे शहर, पोलीस फोटोग्राफी : मुंबई, पोलीस व्हिडिओग्राफी : एसआरपीएफ, संगणक सजगता- कोल्हापूर परिक्षेत्र, श्वान स्पर्धा : नाशिक शहर, घातपात विरोधी तपासणी : गुप्तवार्ता प्रबोधनी, पुणे, कै. अशोक कामटे फिरता चषक : गुप्तवार्ता प्रबोधनी, पुणे
सीसीटीएनएस सर्वोत्कृष्ट घटक कामगिरी : बीड (प्रथम), नांदेड (द्वितीय), रायगड (तृतीय). गुन्हे अन्वेषण विभागाच्या शताब्दी फिरता चषक विजेता संघ : कोल्हापूर परिक्षेत्र.
पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याहस्ते ही पारितोषिके देण्यात आली. सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी संघातील सदस्यांसोबत स्वीकारला. यावेळी श्री. फुलारी यांनी विजेतेपदाबद्दल कोल्हापूर संघाचे विशेष अभिनंदन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.