आमदार अपात्रता सुनावणी सुरु असतानाच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर परदेश दौऱ्यावर!
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक आठवडा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.
घाना देशामध्ये होणाऱ्या ६६व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस ते हजेरी लावणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राहुल नार्वेकर घाना दयावर जाणार आहेत.
घाना देशात ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय परिषद होणार आहे. या परिषदेत जगातील विविध देशांमधील संसद आणि विधीमंडळ प्रमुखांची उपस्थिती असेल. जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नांवर या परिषदेमध्ये विचारमंथन होणार असून राहुल नार्वेकरसुद्धा या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात राज्याच्या विधिमंडळाकडून आजच आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचे वेळापत्रक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षना 2 आठवड्यात सुनावणीची रूपरेषा सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळापत्रक मंगळवारी ठरवले असून ते आज कोर्टात सादर केले जाऊ शकते. आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.