Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गिरगाव खून प्रकरणातील ८ महिन्यांपासून फरार संशयितास अटक, तीन दिवस पोलीस कोठडी

गिरगाव खून प्रकरणातील ८ महिन्यांपासून फरार संशयितास अटक, तीन दिवस पोलीस कोठडी



जत : खरा पंचनामा

गिरगाव (ता. जत) येथे महादेवाप्पा राजशेखर हिरेमठ (वय ३५) यांच्या खून प्रकरणातील संशयित फरारी आरोपीस उमदी पोलिसांनी अटक केली. संशयित दत्ता यल्लाप्पा बजंत्री (रा. कुंभार गल्ली विजयपूर) असे त्याचे नाव आहे. त्याला जत न्यायालयासमोर हजर केले असता २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गिरगाव (ता.जत) येथे सुखदेव साबू ब्याळकुळी यांच्या घरासमोरील पत्रा शेड मधील कट्ट्यावर दारूच्या नशेत महादेवाप्पा हिरेमठ याचा दत्ता बजंत्री याने धारदार शस्त्राने वार करून २८ जानेवारीला खून केला होता. याची फिर्याद प्रशांत चंद्रकांत हिरेमठ यांनी उमदी पोलिसांत दिली होती. मयत व आरोपी दोघेही गिरगाव येथे घर बांधकामाचे काम करीत होते. खून झाल्यासून संशयित आरोपी दत्ता बजंत्री फरार होता.

उमदी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तपास करून संशयित आरोपी दत्ता बजंत्री यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.