अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
जयसिंगपूर सत्र न्यायालयाचा निकाल
जयसिंगपूर : खरा पंचनामा
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची तसेच 55 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जयसिंगपूरचे सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी गुरुवारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे ऍड. उदय कुलकर्णी यांनी काम पाहिले.
अझर इकबाल मुजावर (रा. इचलकरंजी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ऑगस्ट 2016 मध्ये पीडित अल्पवयीन मुलगी घरी निघाली होती. त्यावेळी आरोपी अझर याने तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. यावर जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती.
या खटल्यात 15 साक्षीदार तपासण्यात आले. आज झालेल्या अंतिम सुनावणीत साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्या. गुरव यांनी आरोपीला जन्मठेपेची तसेच 55 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात कुरुंदवाडचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, कॉन्स्टेबल हणमंत बंडगर यांनी महत्वाची भूमिका निभावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.