कोल्हापुरात पाच सराफी दुकाने फोडली, १५ तोळे सोने लंपास
कोल्हापूर : खरा पंचनामा
कासार गल्ली (गुजरी) तील एका इमारतीच्या तळमजल्यावर पाच बंगाली कारागीरांची सोने आटणीची दुकाने आहेत. ही पाचही दुकाने शनिवारी पहाटे चोरट्याने फोडली. या चोरीत सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने दागिने लंपास केले. पोलिसांनी तत्काळ ठसे तज्ज्ञांना पाचारण करीत तपासास सुरुवात केली.
गुजरीजवळील कासार गल्लीत सोने घडणावळीसह आटणीची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. याशिवाय सोन्याचे व बिस्कीट स्वरूपात घाऊक विक्री करणारेही व्यापारी मोठ्या संख्येने आहेत. अशाच एका इमारतीच्या तळमजल्यावर बंगाली कारागीरांची पाच दुकाने आहेत. ही दुकाने कारागीरांनी काम आटपल्यानंतर शुक्रवारी रात्री बंद केली होती. शनिवारी मध्यरात्री १ वाजून ४० मिनिट ते ४ वाजून २० मिनिटांपर्यंत बुरखाधारी चोरट्याने तळमजल्याकडे जाणारे प्रवेशदारावरील कुलुप तोडून प्रवेश केला. पायऱ्या उतरल्यानंतर पहिले सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीसाठी लागणारे कारागीर साहित्याचे दुकान चोरट्याने फोडले.
त्यानतंर पुढील सलग चार दुकानांची कुलपे त्याने कटरने तोडली. प्रत्येक दुकानांमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्याने तेथील घडणावळीसाठी आलेले सोन्याचे दागिने उचलले. ही बाब शनिवारी सकाळी कारागीर दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर निदर्शनास आली. दुकान मालकाने जुना राजवाडा पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. अधिक तपासासाठी ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानूसार सुमारे १५ तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.