Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शितपेयातून गुंगीचे औषध देत महिला पोलिसावर अत्याचार; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा

शितपेयातून गुंगीचे औषध देत महिला पोलिसावर अत्याचार; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा 



पुणे : खरा पंचनामा 

महिला पोलीस कर्मचाऱ्याला घरी बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची अश्लील चित्रफित तयार करत ती व्हायरल करण्याची धमकी खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी पुणे पोलीस दलातीलच एका कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दीपक सिताराम मोधे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी दोघेही मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. लॉकडाऊन काळात आरोपीने फिर्यादी महिला सोबत ओळख वाढवत जेवण करण्यासाठी घरी बोलावले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादी सोबत शरीर संबंध ठेवले. 

या संपूर्ण प्रकरणाची चित्रफीत तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि फिर्यादीच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले. आरोपीने फिर्यादीला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले तसेच वेळोवेळी मारहाण करत पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्या घरातील कपाटातील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज जबरदस्तीने घेऊन गेला. 

खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.