Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यातील गुंड सागर पवार टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांची कारवाई

विट्यातील गुंड सागर पवार टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गणेशोत्सव आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर विटा येथील सागर पवार टोळीला दोन वर्षांसाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. अधीक्षक डॉ. तेली यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 

टोळीप्रमुख सागर अरविंद पवार (वय २६), प्रशांत ऊर्फ चिंगळ्या विजय गायकवाड (वय २३), पवन गजानन खंदारे (वय २०, सर्व रा. विटा), राज किरण जावीर (वय १९, रा. गारडी), रितेश विकास खरात (वय १९, रा. साळशिंगे रोड, विटा), सोहन माणिक ठोकळे (वय ३१, रा. विटा), मयुरेश मनोहर आदाटे (वय २१, रा. विटा), रोहित किरण जावीर (वय २१, रा. गारडी) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

या टोळीवर २०१८ ते २०२२ या काळात खुनाचा प्रयत्न, बेकायदा लोक जमवून जिवे मारण्याच्या उद्देशाने घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान, शिवीगाळ, दमदाटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवाया अजूनही सुरू असल्याने विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्याकडे पाठवला होता. त्याचे अवलोकन करून डॉ. तेली यांनी पुढील तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्याकडे पाठवला होता. त्यांचा चौकशी अहवाल, दाखल गुन्ह्यांचा तसेच सद्यस्थितीचा आढावा घेऊन डॉ. तेली यांनी या टोळीला दोन वषार्साठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विट्याचे निरीक्षक संतोष डोके, सहायक निरीक्षक प्रशांत चव्हाण, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, आण्णा मोहिते यांनी भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.