Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बसस्थानकावर चोरी करणाऱ्या दोन महिलांना : अटक साडेचार लाखांचे दागिने जप्त सांगली एलसीबीची कारवाई

बसस्थानकावर चोरी करणाऱ्या दोन महिलांना : अटक साडेचार लाखांचे दागिने जप्त
सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज आणि तासगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे साडेचार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अशा चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

वर्षा इक्बाल लोंढे (वय ३५, रा. तारदाळ, ता. हातकणंगले), रूक्मिणी अरूण चौगुले (वय ३२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. या पथकाला तासगाव बसस्थानकातून चोरलेले दागिने घेऊन दोन महिला ते विक्री करण्यासाठी शंभर फुटी रस्ता येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.   

पथकाने तेथे सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन महिला तेथे आल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर पथकातील महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये दागिने सापडले. त्याबाबत विचारल्यानंतर त्यांनी ते दागिने मिरज आणि तासगाव बसस्थानकावरून चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडील साडेचार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. दोघींनाही मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, अमर नरळे, प्रकाश पाटील, अजय बेंदरे, रंजना कलकुटगी, शुभांगी मुळीक, सुनीता शेजाळ, ज्योती चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.