आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावी जाणं पोलीस निरीक्षकास पडलं महागात!
मुंबई : खरा पंचनामा
आजकाल सुट्टी मिळत नसेल तर दुसरा उपाय म्हणून अनेक जण आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेणाऱ्या पोलीस निरीक्षकास, हे खोटं बोलणं फार महागात पडलं आहे. यामुळे पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आलं आहे.
आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावाला जाणं पोलीस निरीक्षकास चांगलंच महागात पडलं आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पोलीस निरीक्षकास निलंबित केले आहे. घाटकोपर मुख्यालयात असलेल्या राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी गणपतीला गावी कणकवलीला जाण्यासाठी रजा मागितली होती.
मात्र, संवेदनशील बंदोबस्त असल्याने साप्ताहिक सूट्टी वगळता सगळ्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. १४ तारखेला राखीव पोलीस संजय सावंत यांनी आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेतली. पण, ते आजारी आहेत का? याची खात्री करण्यासाठी त्याच्या ठाकुर्ली येथील घरी पोलीस कर्मचारी पाठवला असता संजय सावंत गावी गेल्याचे समजताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.