सुनेला नडली आणि सासू जीवानिशी मुकली!
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर शहरात सुनेने आपल्या 80 वर्षांच्या वृद्ध सासूची हत्या केली आहे. सुनेनं सासूवर चाकूनं वार करत तिचा खून केला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे मृत सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे सुनेचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सासू आणि सुनेचं काहीतरी कारणावरून भांडण झालं. भांडणाचा राग अनावर झाल्यानं सून पूनम शिखरवार हीने आपली सासू ताराबाई शिखरवार यांच्यावर चाकूनं वार करत त्यांचा खून केला.
याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी सुनेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. प्रतापनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.