मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज!
जालना : खरा पंचनामा
अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षण करीता सुरु असलेल्या आमरण उपोषण स्थळी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलीस आले असता आंदोलकांनी त्याला विरोध केल्यावर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार करून अश्रूधुराच्या नलकांड्या फोडण्यात आल्या.
यामध्ये गावातील आनेक नागरिक जखमी झाले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शुक्रवारी ता. 1 रोजी गालबोट लागले. अप्पर पोलीस अधिक्षक राहुल खाडे उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली यात तोडगा निघाला नाही दरम्यान पोलीस व जमाव यांच्या मध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.
हा प्रकार घडल्यानंतर राज्यातील मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.