सासू, मेव्हण्याला पेट्रोल टाकून जाळुन जावयाची आत्महत्या!
अमरावती : खरा पंचनामा
मद्यधुंद अवस्थेत सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर मारेकरी जावयाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडविणारी ही रक्तरंजित घटना तालुक्यातील वंडली येथे सोमवारी पहाटे १.१५ च्या सुमारास उघड झाली.
पोलिसांनी वंडली येथील झोपडीवजा घरातून तिघांचेही कोळसा झालेले मृतदेह ताब्यात घेतले. सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल ते टाकून ते अक्षरश: जाळून टाकले. वंडली येथील लताबाई सुरेशराव भोंडे (४७), त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (२२) व मारेकरी आशिष ठाकरे (२५, रा. वरूड) अशी मृतांची नावे आहेत.
याप्रकरणी, बेनोडा पोलिसांनी आशिष ठाकरेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
वंडली येथे सोमवारी पहाटे १.१५ दरम्यान लताबाई भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याची माहिती तेथील पोलीस पाटील यांनी बेनोडा पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार स्वप्नील ठाकरे हे अग्निशमन दलासह घटनास्थळावर दाखल झाले. पोलीस व अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून लागलेली आग विझविण्यात आली. त्यानंतर त्या घरात तीन व्यक्तींचे मृतदेह पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळून आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.