सांगलीत गोवा बनावटीची दारू जप्त : एकाला अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ८९ हजार ८७८ रुपयांच्या दारुच्या बाटल्या तसेच कार असा १ लाख ८९ हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.
याप्रकरणी दत्तात्रय भीमराव बंडगर (४७, रा. हनुमान मंदिर समोर संजयनगर सांगली) यास अटक करण्यात आली. संजयनगर येथे हनुमान मंदिरासमोरील बाजूस एका चारचाकी (एमएच १० ई ६६८०) वाहनातून बेकायदा दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कचे निरिक्षक बजरंग पाटील, दुय्यम निरिक्षक हनमंत यादव आदींच्या पथकाने परिसरात सापळा लावला.
त्यावेळी मद्याचे बारा बॉक्स तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी देखील जप्त करण्यात आली. याप्रकरणी दत्तात्रय बंडगर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत बंडगर यास न्यायालयासमोर हजर केले त्याला दि. २३ पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ही कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिंचालकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक बजरंग पाटील, दुय्यम निरीक्षक श्रीमंती यादव, श्रीपाद पाटील, प्रकाश माने जवान, मीना देवल, आनंदमुर्ती भिसे आदिंच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.