अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यास २ वर्षांची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षे कारावास आणि २५ हजार रूपयांचा दंड, दंड न दिल्यास चार महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे, साटविलकर यांनी काम पाहिले. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
यासीन शौकत कुरुंदवाड (वय ३७, रा. शंकरा कॉलनी, जत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी क्लासला, शाळेला जात-येत असताना यासीन तिचा दुचाकीवरून पाठलाग करत होता. त्याने त्याचा मोबाईल क्रमांक तिला देऊन त्यावर फोन कर असे म्हणत होता. तसेच तिच्या शाळेबाहेर उभा राहून तिला इशारे करत होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यावेळी सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे तपासल्यानंतर न्या. हातरोटे यांनी यासीन याला शिक्षा सुनावली. या खटल्यात जतचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. कांबळे, रोहित कोळी, सुनीता आवळे, रेखा खोत यांनी मदत केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.