Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास अटक सांगली एलसीबीची कारवाई

सांगलीत रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास अटक
सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शहरातील कुपवाड रस्त्यावरील सूतगिरणीजवळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून विश्रामबाग येथील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून एक सोन्याची अंगठी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अनिल विश्वास चौगुले (वय ५०, रा. डुबल धुळगाव, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरीच्या वाढलेल्या घटनांमुळे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. सांगली-कुपवाड रस्त्यावरील सूतगिरणीजवळ अनिल चौगुले सोन्याची अंगठी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात एक सोन्याची अंगठी सापडली. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती गुलाब कॉलनी येथे एका वृद्धाकडून ती जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली. अंगठी जप्त करून पथकाने त्याला अटक केली. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, बिरोबा नरळे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, संदीप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.