भीमनगर नाल्यावर संरक्षक भिंत बांधा, नागरी समस्या सोडवा!
अण्णा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव मासाळे यांची मागणी
सांगली : खरा पंचनामा
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामधील नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात. भीमनगर येथे असलेल्या मीरा हाऊसिंग सोसायटीजवळ असलेल्या नैसर्गिक नाल्यावर संरक्षक भिंत बांधावी. तसेच या नाल्यावर आवश्यक त्या ठिकाणी सीडी वर्क पूल बांधण्यात यावेत. आदी मागण्यांचे निवेदन अण्णा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव मासाळे यांनी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मासाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगलीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. शेरी नाल्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यावर आतापर्यंत कोट्यावधी रूपयांचा निधी खचर् करण्यात आला आहे. तरीही शेरीनाल्याचा प्रश्न सुटलेला नाही. सांगलीतून एक नाला थेट कृष्णा नदीत मिसळतो. हा नाला भीमनगर भागातून येतो. तो नाला वरद हॉस्पिटलच्या मागील बाजूने सांगली-माधवनगर रस्ता ओलांडून थेट कृष्णा नदीत मिसळतो.
त्यामुळे मीरा हाऊसिंग सोसायटीच्या बाजूने जाणाऱ्या या नाल्यावर जासूद मळा आणि टिंबर एरिया या ठिकाणीही सीडी वर्क पूल बांधण्यात यावेत. या नाल्याचा या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. किरकोळ पाऊस झाला तरी हा नाला दुथडी भरून वाहतो. त्यामुळे या नाल्याशेजारी असलेल्या भीमनगर, मीरा हाऊसिंग सोसायटी, गोकुळनगर, व्यंकटेशनगर, इंद्रप्रस्थ, इदगाह मैदान आदी ठिकाणी असलेल्या गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरते. त्यामुळे या नाल्याची खोली वाढून या नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे, असेही मासाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
चैत्रबन नाल्याच्या धर्तीवर या नाल्याचे काम करावे. भीमनगरच्या पूर्वेस रेल्वे ब्रीज आहे. त्यामुळे तेथेही सीडी वर्क पूल बांधण्याची गरज आहे. मीरा हाऊसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या बंधाऱ्यांची उंची वाढवावी. हा नाला कृष्णा नदीत थेट मिसळत असल्याने त्यावरही उपाययोजना करावी असेही मासाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.