Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अख्खं कोल्हापूर गणपतीला निरोप देण्यात अन् 'या' मॅडम तीन टक्क्यानं लाच घेण्यात मग्न!

अख्खं कोल्हापूर गणपतीला निरोप देण्यात अन् 'या' मॅडम तीन टक्क्यानं लाच घेण्यात मग्न!





कोल्हापूर : खरा पंचनामा

अख्खं कोल्हापूर गुरुवारी अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात मग्न असतानाच चंदगंड तालुक्यात तीन टक्क्यानं लाच मागणाऱ्या महिला उपअभियंत्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे 12 लाख रुपयांचे बिल मंजूर केलं म्हणून तीन टक्के कमिशन म्हणून 33 हजार रुपयांची मागणी चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेनं (रा. बेळगाव, हनुमान नगर, भक्तीवेस मंगल कार्यालयाजवळ, मूळ पत्ता, सी वन-506, साकेत पॅराडाईज, आधारवाडी जेल रोड, कल्याण पश्चिम जि. ठाणे) केली होती. तडजोडीअंती 25,000 रुपये लाच स्वीकारताना सुभद्राला रंगेहाथ सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली. या प्रकरणातील तक्रारदार ठेकेदार असून त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार ठेकेदार आहे. मुळ ठेकेदारांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडीमधील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम घेतलं होतं. घुल्लेवाडीमध्ये जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून तक्रारदाराकडे मंजूर केलेल्या 12 लाख रुपयांच्या बिलामध्ये उपअभियंता असलेल्या सुभद्रा कांबळेनं तीन टक्के दराने 33,000 रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तडजोडीअंती 25,000 रुपये लाच देण्याचे ठरले होते. लाचेची ठरलेली रक्कम तक्रारदाराकडून स्वतः सुभद्रा स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. आरोपी सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेविरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.