कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी!
लातूर : खरा पंचनामा
कर्तव्यावर असलेल पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लातूरमध्ये घडली जाहे. या घटनेमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे. पांडुरंग पितळे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पितळे हे लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल पाडुरंग पितळे यांनी कर्तव्यावर असताना डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पितळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पांडुरंग पितळे हे विवेकानंद पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांची ड्युटी गांधी चौकात लावण्यात आली होती. याचदरम्यान पितळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पितळे यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी कोणत्या कारणामुळे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलां हे समजू शकले नाही. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.