कॅफेत आढळले बेड अन् कंडोम, कोल्हापुरात निर्भया पथकाची कारवाई!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर शहरात निर्भया पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका कॅफेवर कारवाई केल्यानतंर धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. निर्भया पथक जेव्हा कॅफेत पोहोचले तेव्हा हा कॅफे आहे की लॉज असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती बघायला मिळाली. निर्भया पथकाने कॅफेवर कारवाई केली असून आता अधिक चौकशी सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजारामपुरीतील टाकाळा चौकात एका कॅफेवर निर्भया पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अनेक कपल्सना ताब्यात घेतलं आहे. बाहेरून कॅफे दिसत असला तरी आत बेड आणि कंडोमची पॅकेट आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यातसुद्धा निर्भया पथकाने एका कॅफेवर कारवाई केली होती. तेव्हा कॅफेत अंधार करून अश्लील चाळे करत बसलेल्या जोडप्यांना निर्भया पथकाने ताब्यात घेतलं होतं. मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम, संभीजनगर या परिसरात छापे टाकले होते. बस थांब्यावर रोड रोमेओंनी शालेय विद्यार्थीनीची छेड काढली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निर्भया पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, निर्भया पथकाने जेव्हा कॅफेंबाबात माहिती घेतली तेव्हा कॅफेत धक्कादायक प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.