Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिरोळ तहसीलवर धडकले मराठयांचे वादळ! लाठीमाराच्या निषेधार्थ शिरोळ तालुका कडकडीत बंद

शिरोळ तहसीलवर धडकले मराठयांचे वादळ! 
लाठीमाराच्या निषेधार्थ शिरोळ तालुका कडकडीत बंद



शिरोळ : खरा पंचनामा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीमार व गोळीबाराच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुक्यातील मराठयांचे वादळ तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले.

जालना जिल्ह्यातील मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील मराठा बांधवांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोळ तालुका सोमवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला. सकाळी ११ वाजता तालुक्यातील विविध गावांतून मराठा समाजबांधव रॅलीने येथील शिवाजी चौकात दाखल झाले. त्यानंतर मोर्चाची सुरवात झाली. 

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संतप्त आंदोलकांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर लाठीमार व गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्याचा शोध घ्यावा, तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

जयसिंगपुरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने, माजी जि. प. सदस्य स्वाती सासणे, साजिदा घोरी, महिपती बाबर, रामभाऊ मधाळे, भरत बँकेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, डॉ. अतुल पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव-घूणकीकर, बंटी देसाई, आप्पा बंडगर, प्रतीक पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. 

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, डॉ.सविता पाटील, शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई, आगरचे सरपंच अमोल चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, सागर धनवडे, धनाजी पाटील-नरदेकर, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पवार, सचिन शिंदे, पराग पाटील यांच्यासह शिरोळ तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.