Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत भरदुपारी विवाहितेवर चाकूहल्ला!

सांगलीत भरदुपारी विवाहितेवर चाकूहल्ला!



सांगली : खरा पंचनामा

शहरातील सावंत प्लॉट परिसरात आज दुपारी विवाहितेवर चाकूहल्ला करण्यात आला. तिच्यावर तीन गंभीर वार झाले आहेत. घटनेनंतर तिला तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

दीपा परशुराम चौगुले (वय २२, रा. सावंत प्लॉट) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. राहुल दुर्गाप्पा पाथरवट (२१) याने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपा यांच्यावर तीन वार झाले असून जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दीपा चौगुले या सावंत प्लॉट परिसरात राहतात. त्याच परिसरात राहुल हा देखील राहतो. आज दुपारी चारच्या सुमारास दोघात वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर राहुल याने चाकूने पाठीवर, पोटावर असे तीन वार केले. त्यानंतर जखमी दीपा या जखमी अवस्थेत होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांनी जखमींचा जबाब घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.