Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोन्याच्या तस्करीप्रकरणी कस्टमचेच अधिकारी अटकेत!

सोन्याच्या तस्करीप्रकरणी कस्टमचेच अधिकारी अटकेत!



काठमांडू : खरा पंचनामा

हाँगकाँगहून काठमांडूला आणलेल्या एक क्विंटल सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयबीने विमानतळावर काम करणाऱ्या सीमाशुल्क विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

विमानतळावरून सोन्याची खेप बाहेर काढण्यात या तीन अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. सीआयबीचे एआयजी किरण बज्राचार्य यांनी सांगितले की, सोने तस्करी प्रकरणात सीमाशुल्क विभागाचे अधिकारी पुष्पा जोशी, वीरेंद्र नेपाळी आणि त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत कमल परियार यांना दीर्घ चौकशीनंतर आज अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान विमानतळावरून सोन्याची खेप बाहेर काढण्यात या तीन अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली. त्यांच्याविरोधात सीआयबीला पुरेसे पुरावे सापडले आहेत. ब्रेक शूमध्ये ठेवून हाँगकाँगमधून सोन्याची तस्करी केली जात होती. त्यासाठी तस्कर बनावट कंपनी तयार करून त्याद्वारे तस्करीचे सोने नेपाळमध्ये आणत होते. 

सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीआयबीने आतापर्यंत 12 चिनी नागरिकांसह एकूण 32 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दोघांना भारतातून अटक करून नेपाळमध्ये आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयबीची एक टीम हाँगकाँगमध्ये तर दुसरी टीम दिल्लीत हजर झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.