अजित पवारांकडून थेट फडणवीसांच्या खात्यात हस्तक्षेप!
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (११ सप्टेंबर) देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याची महत्वाची बैठक घेतली. त्यामुळे अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
या बैठकीवरून पुन्हा एकदा महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यातील हस्तक्षेप केल्यानंतर आता अजित पवार हे जाणून बुजून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून ऊर्जा खात्याची बैठक घेतल्याने भाजप नेत्यांमध्ये देखील नाराजी पसरली असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी सोमवारी मंत्रालयात 'महावितरण'शी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यामध्ये माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांचा समावेश होता. या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, डॉ. किरण लहामटे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष.
तर, संजय शिंदे, दिलीप मोहिते- पाटील, दिलीप बनकर, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. अशी बैठक घेऊन अजित पवार हे फक्त आपल्याच गटातील आमदारांचे प्रश्न सोडवत आहेत, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.