भरदिवसा वाहनचालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक
सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील बायपास रस्ता परिसरात भरदुपारी साडेतीनच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने वाहनचालकाला जबरदस्तीने अडवले. त्यानंतर तिला सांगलीत सोडायला लावून एका पेट्रोल पंपाजवळ थांबवून महिलेसह दोघांनी वाहनचालकाकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. याप्रकरणी दोघा तरूणांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सोहेल राजेसाब गलगले (वय २४, रा. अभिनंदन कॅलनी, सांगली), आसिफ अजमुद्दीन शेख (वय २५, रा. संजयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. ३१ आगस्ट रोजी धनंजय मगदूम (रा. कसबेडिग्रज) बायपास रस्त्याने गावी निघाले होते. त्यावेळी एका बुरखाधारी महिलेने त्यांना जबरदस्तीने अडवले. त्यानंतर माझ्या नवऱ्याचा अपघात झाल्याचे खोटे सांगून सांगलीला सोडण्यास सांगितले. ते सांगलीला येत असताना एका पेट्रोल पंपाजवळ त्या महिलेने गाडी थांबवण्यास सांगितले. त्यावेळी मगदूम महिला यांच्याशी वाद घालत असताना दोघे संशयित तेथे आले. त्यांनी त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघाही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. यातील सोहेल गलगले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, योगेश पाटील, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.