Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळची ज्ञानू खोत टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांची कारवाई

कवठेमहांकाळची ज्ञानू खोत टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गणेशोत्सव आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ येथील ज्ञानू खोत टोळीला दोन वर्षांसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. अधीक्षक डॉ. तेली यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 

टोळीप्रमुख ज्ञानू आण्णाप्पा खोत (वय २३, रा. कोंगनोळी), सुरेश ऊर्फ अर्जुन महादेव पोतदार (वय २५, रा. अग्रण धुळगाव), संदीप भारत पाटील (वय २०, रा. कोंगनोळी), मारूती दादासो लिंगले (वय २२, रा. कोंगनोळी) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

या टोळीवर २०२२ या चोरी, मालमत्तेचे नुकसान असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवाया अजूनही सुरू असल्याने कवठेमहांकाळ पोलिसांनी या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्याकडे पाठवला होता. त्याचे अवलोकन करून डॉ. तेली यांनी पुढील तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे पुढील चौकशीसाठी पाठवला होता. त्यांचा चौकशी अहवाल, दाखल गुन्ह्यांचा तसेच सद्यस्थितीचा आढावा घेऊन डॉ. तेली यांनी या टोळीला दोन वर्षांसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतीराम पाटील, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, मनीषा बजबळे यांनी भाग घेतला. 

दीड वर्षात ७ टोळ्यांमधील २८ जण हद्दपार
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कार्यभार घेतल्यापासून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. २०२२ मध्ये एका टोळीतील तिघांना हद्दपार करण्यात आले होते. तर जानेवारी २०२३ ते आजअखेर ६ टोळ्यांमधील २५ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षात एकूण ७ टोळ्यांमधील २८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.