Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले!

कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले!



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतीत सर्वच संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. 

त्यानुसार कुणबी मराठा समाजाच्या नोंदी निजामकालीन असल्याची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक 13 सप्टेंबर) रोजी हैदराबादला रवाना झाले होते. मात्र, या दौऱ्यातून खूप काही हाती लागले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर, जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी सरकारने निजामकालीन दस्तऐवज शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे एक पथक हैदराबादला पाठविले होते. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.