Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दबावाला भीक घालणारी आमची औलाद नाही!

दबावाला भीक घालणारी आमची औलाद नाही!



कोल्हापूर : खरा पंचनामा

दबाव असल्याने आम्ही सत्तेमध्ये सामील झालो, अशी आमची बदनामी केली जात आहे; परंतु लोकांची कामे पूर्ण करण्याचा आमच्यावर दबाव होता. कामांना लागलेली स्थगिती उठविण्यासाठी दबाव होता, असे स्पष्ट करत कुठल्याही दबावाला भीक घालणारी आमची औलाद नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रविवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या उत्तरदायित्व सभेत ते बोलत होते.

मागील अडीच वर्षे लोकांची कामे खोळंबली. विरोधी पक्षात राहून कामे होत नव्हती. त्यामुळे बहुजन लोकांची कामे करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत, परंतु आमची बदनामी केली जात आहे. परंतु आमच्यावरील टीका यापुढे खपवून घेणार नाही. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रयत्न करू, असे पवारांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रयत्न करू, असे पवारांनी यावेळी सांगितले. मदतीपासून वंचित राहिलेल्यांना निधी दिला जाईल. जातीय सलोखा बिघडण्याचा प्रयत्न केल्यास हाणून पाडू. तरुण पिढीला बळ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिली.

दुष्काळाचे सावट दूर व्हावे, पाऊस चांगला व्हावा, यासाठी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूर पुरोगामी चळवळीचे केंद्र आहे, त्यामुळे कोल्हापुरातील सभा महत्त्वाची असते, असेही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.