टरबुज पायाखाली चिरडून जालना लाठीमारचा निषेध!
कल्याण : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलेल्या मराठा आंदोलकांवर जालना जिल्ह्यात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. कल्याण मध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवाजी चौक येथे राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला.
आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत टरबूज पायाखाली चिरडून निषेध व्यक्त केला.
फडणवीस यांनी पुढील 48 तासात राजीनामा द्यावा अन्यथा मराठा समाज वेगळ्या पध्दतीने आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात वेगळ्या पध्दतीने आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.
मराठा आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण मध्ये रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कल्याण शिवाजी चौक येथे मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या प्रमाणावर मराठा कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मराठा समाज कार्यकर्ते हर्षवर्धन पालांडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांडे यांच्यावर करण्यात आलेल्या बेछूट लाठीच्या विरोधात हे आंदोलन आहे, असे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.