"अजित पवार सरकारच्या बाहेर पडा" !
बारामती : खरा पंचनामा
जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ‘सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा' अशा घोषणांनी मराठा आंदोलकांनी बारामती दणाणून सोडली आहे.
मराठा संघटनांनी आज बारामती बंदची हाक दिली असून मोठा मोर्चा काढण्यात येत आहे. याचवेळी या रॅलीत अनेक मराठा बांधवांनी अजित पवारांच्यासंबंधी या अशा घोषणा दिल्या आहेत.
दरम्यान जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. ही घटना घडल्यानंतर राज्यात सर्वत्र मराठा समाज आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कितीही आश्वासने दिली तरी मराठा समाज ती मानण्यास तयार नाही. अनेक ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे असे आवाहन मराठा समाजाने केले आहे. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.