जमीन नावावर करण्यासाठी जावयाचे अपहरण करुन बांधले गोठ्यात!
पुणे : खरा पंचनामा
मुलीच्या नावावर जमीन करुन देण्यासाठी सासरे व त्याच्या नातेवाईकांनी जावयाचे अपहरण करुन त्याला बीडला नेले. तेथे त्याला चक्क गोठ्यामध्ये हातपाय बांधून डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे सासरे प्रकाश गेमा राठोड, चलुत सासरे रमेश गेमा राठोड व इतर नातवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोम गेता राठोड (सर्व रा. शाहुनगर, पिंपळा गेवराई, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आडे यांनी त्यांची पत्नीचे नावावर जमीन करावी, अशी त्यांच्या सासऱ्यांची मागणी होती. मात्र, त्याला फिर्यादी यांनी नकार दिला होता. या कारणावरुन सासऱ्यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने ४ सप्टेबर रोजी फिर्यादी यांचे तोंड दाबून स्कॉपियोमध्ये बसविले.
त्यांना बीडमध्ये नेले. तेथे गेल्यावर गोठ्यामध्ये दोरीने हातपाय बांधून डांबून ठेवले. फिर्यादींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नी आर्तिका हिच्या नावावर जमीन कर नाही तर तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. ६ सप्टेबर रोजी फिर्यादी यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.