Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र पोलिस दलाकडील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यपालांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बदलीचे हे आदेश काढण्यात आले आहेत. 

नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षक विश्वास दत्तू पांढरे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गचे अपर पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांची छत्रपती संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.