Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरदिवसा घरफोडी करणाऱ्यास अटक, ४५ हजारांची रोकड जप्त विटा पोलिसांची कारवाई

भरदिवसा घरफोडी करणाऱ्यास अटक, ४५ हजारांची रोकड जप्त
विटा पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

विटा येथील मुंडे मळा येथील एका घरातून भरदिवसा रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची ४५ हजारांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.  

अमित सुरेश राठोड (वय १८, सध्या रा. विटा, मूळ रा. नरसलगी, विजापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी विट्यातील मुंडे मळ्यातील मोहमद सल्लाऊद्दीन यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञाताने ४५ हजारांची रोकड लंपास केली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरट्यांना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाला ही चोरी अमित राठोड याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली.  

पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, संभाजी सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.