Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत पोलिसाची गळफास घेवून आत्महत्या

सांगलीत पोलिसाची गळफास घेवून आत्महत्या



सांगली : खरा पंचनामा

शहर पोलिस ठाण्यातील पोलिसाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा घटना उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

वसीम मुसा अत्तार (वय ४२, रा. मुजावर प्लॉट, बसस्थानक परिसर, सांगली) असे मृताचे नाव आहे. वसीम अत्तार हे चार महिन्यापुर्वी शहर पोलिस ठाण्यात बदलीने रूजू झाले होते. यापुर्वी ते महात्मा गांधी पोलिस चौकीत कार्यरत होते. काल ते ड्युटीवरून घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. 

त्यानंतर तातडीने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र तरूण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.