Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अपघातात जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अपघातात जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू



बारामती : खरा पंचनामा

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे, ता. इंदापूर) यांचे सोमवारी  उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी सायंकाळी ते व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुन्हा बारामतीला हलविण्यात आले होते. येथे उपचारा दरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत सध्या ते कार्यरत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.