Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सांगलीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा
विश्रामबाग पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथील एका महिलेच्या घरात चालणारा तीन पानी जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी घरमालकिणीसह १६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी ३२ हजार ९७० रुपयांची रोकड व मोबाईल जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजू सोनटक्के (वय ५१, समतानगर, मिरज), वैभव कायपुरे (४५, वारणाली), सचिन मोहिते (३२, सावंत प्लॉट), अन्वर पिंपरी (५५, विद्याविहार कॉलनी), जकराया नंदगोंडे (४२, हनुमाननगर), परमेश्‍वर देवण (३६, प्रगती कॉलनी), जावीद हाकीम (५२, गणेशनगर), हनुमंत परनाकर (२६, इंदिरानगर), शिवा बगले (३२, शामरावनगर), संजय लोंढे (४८, वडर कॉलनी), सुंदर लोंढे (४४, इंदिरानगर), सतीश कांबळे (२९, इंदिरानगर), अविनाश भोसले (३४, अभयनगर), हुजेब बारगीर (३०, शामरावनगर), मोहन पाटील (३७, हनुमाननगर) व घरमालकीण रुपा लोंढे (इंदिरानगर) अशी संशयितांची नावे आहेत.

मटका, जुगारसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबाग ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस शहरात गस्तीवर होते. त्यावेळी इंदिरानगर येथील रुपा लोंढे या महिलेच्या घरात तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. संशयित पंधराजण जुगार खेळताना मिळून आले. संशयितांकडून ३२ हजार ९७० रुपयांची रोकड व २९ हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अंमलदार प्रशांत माळी यांनी फिर्याद दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.