आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली!
जालना लाठीमाराचा तीव्र निषेध
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील आटपाडी येथे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी आटपाडीत मोर्चा काढण्यात आला. या वेळी खासदारांना व आमदारांना श्रद्धांजली वाहन्यात आली. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी आटपाडी बस स्थानक येथे मराठा समाज बांधव एकत्र आले होते. बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेमार्गे मोर्चा बाजार पटांगण ते आटपाडी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आला.
यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, अनिता पाटील, गौरीहर पवार, शरद पवार, प्रा. विजय शिंदे, बापूसाहेब गिड्डे, आनंदरावबापू पाटील, डी.एम. पाटील, अँड. धनंजय पाटील, सौरभ पाटील, बी. ए. पाटील, अतुल यादव, मोहन देशमुख, शिवाजी पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, तानाजी नांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. त्यानंतर मोर्चातर्फे तहसीलदाराना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.