...अन पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या!
सांगली : खरा पंचनामा
शहरातील पुष्पराज चौकात दहा, बारा आंदोलक जमा झाले. ‘हमारी मांगे पुरी करो’, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. कोणालाच काही समजलं नाही. तेवढ्यात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली. पोलिस पाहून आंदोलन आक्रमक झाले आणि त्यांनी हल्ला केला. तेवढ्यात अश्रुधुराच्या नळकाड्या पोलिसांनी फोडल्या आणि पांगापांग झाली.
हा सारा थरार पाहून नागरीक ही घाबरले. अखेर पोलिसांनी हे दंगल नियंत्रण पथकाची प्रत्यक्षिक असल्याचे जाहीर केल्याने सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, उत्सवात शांतता रहावी, यासाठी हे दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली विभागाचा यात समावेश होता. निरीक्षक संजय मोरे, अभिजीत देशमुख, शिवाजी गायकवाड यांच्यासह पथके तैनात होती. यासह दंगल नियंत्रण पथकाची स्वतंत्र टीम याठिकाणी दाखल होती. त्यानंतर उपाधीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर चौकातून पोलिसांनी संचलन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.