बेकायदा मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल, ढाब्यांवर कारवाई!
५ मद्यपींना न्यायालयाकडून दंड ढाबा चालकांवरही गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरजेतील परमिट रूम, बिअर बारचा परवाना नसलेल्या हॅटेल, ढाबे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ५ मद्यपींना न्यायालयाने दंड ठोठावला असून काही ढाबा चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली आणि मिरजेतील संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल गावरानचे मालक मच्छिंद्र वाघमारे, हॉटेल शिवारचे मालक रामचंद्र पाटील, हॉटेल महाराजा ढाबाचे मालक संजय भोसले, हॉटेल सूरज गार्डनचे मालक तुकाराम बंडगर या हॉटेल, ढाब्यांचा कारवाईमध्ये समावेश आहे. त्याशिवाय विशाल जिरनाळे, संजय सरगर, रोहित हार्डीकर, अविनाश कोळेकर, आशीष जाधव या मद्यपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासह ढाबा चालकांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेचे निरीक्षक अरूण कोळी, दुय्यम निरीक्षक शैलेश चव्हाण, ए. एस. लोंढे, एस. एस. केंगारे, श्रीपाद पाटील, एस. एन. आटपाडकर, प्रकाश माने, कविता सुपने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
धाब्यावर दारूविक्री करणे तसेच पिण्यास जागा उपलब्ध करून देणे तसेच ग्राहकांनी अशा ठिकाणी दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.