राज्यभरात धनगर समाज आक्रमक!
गोपीचंद पडळकरांच्या एका ट्विटनं चर्चांना उधाण
मुंबई : खरा पंचनामा
चोंडी येथे धनगर समाजातील कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचा चौदावा दिवस उजाडला तरीही सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात नसल्याने आता धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात २५ ठिकाणी तसेच खंबाटकी घाटात रास्ता रोको केला आहे.
आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर! नाद करू नका! यळकोट यळकोट जय मल्हार ! तसेच या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात पडळकरांनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचा झेंडा फडकवत असताना दिसतायेत, त्या व्हिडिओत म्हटलंय की, जिथे गरज पडेल तिथे बाळूमामा झालं पाहिजे आणि वेळ पडलीच तर बापू बिरू व्हायची सुद्धा तयारी असली पाहिजे असं आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.