ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप
मिरज : खरा पंचनामा
शिंदे-ठाकरे गटाच्या स्वागत कमानीने संघर्षाची ठिणगी पडली आहे. स्वागत कमानीवरील देखाव्यास शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळ, मिरज शहरप्रमुख किरणसिंग रजपूत यांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. स्वागत कमानीवरील छायाचित्रांवर आक्षेप घेतला आहे.
शहरातील संघर्ष मिरज तालुक्यातही पाहण्यास मिळत आहे. सुभाषनगर येथे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय काटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या स्वागत कमानीवर 'यावर होऊदे चर्चा...' मथळ्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बंडखोरीसह गुवाहाटीतील बैठक, मणिपूर येथील हिंसाचार व दिल्ली येथील कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे.
मात्र या कमानीवर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चांडाळ, मिरज तालुकाप्रमुख किरणसिंग राजपूत यांनी आक्षेप घेतला आहे. मिरजेत गतवर्षी स्वागत कमानीच्या जागेवरून संघर्ष निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिंदे गटाला स्वागत कक्ष, तर ठाकरे गटाला स्वागत कमान देऊन समझोता केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.