मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानाने जालन्याकडे रवाना
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला असून सरकार देखील अडचणीत आलं आहे. जालना येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत.
त्यातच आज राज्य सराकरच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील मंत्री उदय सामंत यांना आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जालन्याला पाठवलं आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन जालना आंतरवली सराटी गावाकडे तात्काळ रवाना झाले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आज जळगावात "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना विशेष संदेश देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने औरंगाबादला पोहोचणार आहे. त्यानंतर ते जालन्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी सामंत यांनी आंदोलनस्थळी उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि नेते अर्जून खोतकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.