Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार 'इन' अन् गोपीचंद पडळकर 'आऊट'!

अजित पवार 'इन' अन् गोपीचंद पडळकर 'आऊट'!



मुंबई : खरा पंचनामा

गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले होते. योगायोगाने याच वेळी सागर बंगल्यावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकार हेही उपस्थित होते.

अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. अजित पवार सागर बंगल्यावर येताच गोपीचंद पडळकर बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार गणपतीच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारी बंगल्यावर पोहोचले होते. याचवेळी तेथे गोपीचंद पडळकर उपस्थित होते. अजित पवार आल्याचं कळताच गोपीचंद पडळकर यांनी बंगल्याच्या बाहेर पडण्याचं ठरवलं. अजित पवार एका गेटने आत गेल्यानंतर पडळकर दुसऱ्या गेटमधून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यामधील वाद टोकाला गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर येण्याचे टाळल्याचं बोललं जातंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.