Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात?

भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात?



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात अनेक सर्व्हे केले जात आहेत. मात्र, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर भाजपने केलेल्या सर्व्हेत त्यांच्या राज्यातील ४० टक्के जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत, पण उमेदवार बदला, असे धक्कादायक निष्कर्ष भाजपच्या सर्वेक्षणात समोर आल्याने आमदार-खासदारांची धाकधूक वाढली आहे.

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी काही राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यात सर्व्हे केला होता. त्यात प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आमदार-खासदारांचे कार्य, जनता व पदाधिकाऱ्यांशी वर्तन, समाजमाध्यमांवरील सहभाग, जनतेचे मोदी व आमदार-खासदारांविषयीचे मत आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. 

त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी आमदारांशी चर्चा करून त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यात भाजपच्या प्रत्येक आमदार-खासदाराचे सर्वेक्षणानुसार रिपोर्ट कार्ड देण्यात आले व त्याविषयी कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली. लोकप्रतिनिधीच्या कामानुसार त्यांना श्रेणी देण्यात आल्या असून तो मतदारसंघ भाजपला किती सुरक्षित आहे किंवा धोक्यात आहे, याविषयी बारीकसारीक तपशील देण्यात आला आहे.

भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी सध्याच्या परिस्थितीत साधारणपणे ६० टक्के जागा भाजप जिंकू शकते आणि ४० टक्के जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष भाजपने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहेत. भाजपने विधानसभेच्या तब्बल १७० जागा लढवण्याची तयारी केल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.