जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला सांगलीच्या महापौरांची दांडी : चर्चेला उधाण!
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत कृष्णा नदीच्या काठी आज
तरूण मराठा बोट क्लबतर्फे होड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही या कार्यक्रमाला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित राहिले नाहीत. याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सूर्यवंशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातच रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सांगलीवाडीच्या या कार्यक्रमात महापौर सूर्यवंशी यांची अनुपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यापूर्वी सूर्यवंशी यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावर त्यांनी सारवासारव करून ती विकास कामांसाठी भेट असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी त्यांनी मी जयंत पाटील यांच्याच गटात असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर आज सांगलीत झालेल्या कार्यक्रमात सूर्यवंशी उपस्थित नसल्याने ते नेमके कोणाच्या गटात आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.