मुंबईत महायुतीच्या बैठकीला सुरूवात
मुंबई : खरा पंचनामा
एका बाजूला देशातील विरोधी पक्षाच्या त्यांची मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होत आहे.
महायुतीच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. तर महायुतीचे सर्व पदाधिकारी देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांवर चर्चा होणार असून, या जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.